Information About Association
Kind Heart, Non-Profit Organization
This is a MHCHO organization websites. You can feel free to use it. Please tell your friends about Thank you.
Our Mission
Sed leo nisl, posuere at molestie ac, suscipit auctor quis metus
- MHCHO
- MHCHO
STATE BODY DETAILS
Member 1
klllllllllklkjm klmlklkmlmk
PRESIDENTS DESK
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना: एक संघर्षमय वाटचाल
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मधील महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ही समूदाय आरोग्य अधिकारी यांची (Community Health Officers - CHO) आणि कंत्राटी कर्मचारी यांची एक सर्वात मोठी संघटना आहे, ज्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवा सुधारणे, तसेच समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आहे. संघटनेची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धती, आणि आंदोलनांचा एक ऐतिहासिक आलेख पुढीलप्रमाणे आहे:
संघटनेची स्थापना आणि उद्दिष्टे-
महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य व कल्याण केंद्रांची (Health and Wellness Centres) स्थापना करण्यात आली. यामध्ये सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
2017 साली समुदाय आरोग्य अधिकारी पदाची सुरुवात झाली, परंतु सुरुवातीपासूनच अनेक समस्या होत्या:
1. कमी मानधन.
2.कामाच्या स्वरूपात अनियमितता.
3. जाचक धोरण.
4. CHO ला वाटेल तिथे कामास लावणे.
5. कोविड मध्ये CCC पासून DCHC मध्ये सतत ड्युटी लावणे.
6. कामावर आधारित मोबदला कधीही वेळेवर न भेटणे.
7. बदली धोरण नसणे.
8. राज्यभर CHO कार्यक्रमात सुसूत्रता नसणे.
9. अतिदुर्गम भागात मोबदला न मिळणे.
10. वाहतूक,महागाई भत्ता न मिळणे.
11. नवनवीन येणाऱ्या समस्या आणि अडचणी.
ही परिस्थिती लक्षात घेऊन, 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना स्थापन झाली.
संघटनेची प्रमुख उद्दिष्टे:
1. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे मानधन वाढवणे.
2. सेवेत स्थिरता व शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळवणे.
3. कामाचे ओझे कमी करणे व आवश्यक प्रशिक्षण देणे.
4. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचवणे.
5. समूदाय आरोग्य अधिकारी यांना वेगळी ओळख निर्माण करून देणे.
---
संघटनेचे कार्य आणि आंदोलनं
संघटनेने अनेक ठिकाणी आंदोलनं व मोर्चे काढले. त्यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा:
1. मानधनवाढीसाठी आंदोलन:
2019-2020 मध्ये, सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांचे मासिक मानधन होत असताना 5% वेतनवाढ मिळत नव्हती. संघटनेने राज्यस्तरीय लक्षवेधी आंदोलन केले आणि काढले व सरकारशी वारंवार चर्चा केली. यामुळे मानधनात काही प्रमाणात वाढ करण्यात आली.
2. स्थिरतेसाठी लढा:
समुदाय आरोग्य अधिकारी हे "कंत्राटी पद्धतीने" नियुक्त होते. संघटनेच्या दबावामुळे, 2023 मध्ये सर्व संवर्गीय राज्य स्तरीय आंदोलनामुळे nhm मध्ये ऐतिहासिक शासन निर्णय घेतला त्यामुळे अधिकाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
3. कामाचे ओझे कमी करण्यासाठी मोहिम:
2023 मध्ये झालेल्या आंदोलनात 23 इंडिकेटर वरून 17 इंडिकेटर हे cho च्या कामावर आधारित मोबदला मध्ये कमी करण्यात आले.
CHO वर वैद्यकीय सल्ला, आरोग्य शिक्षण, तसेच कार्यक्रमांचे अहवाल देणे यांसह अनेक जबाबदाऱ्या होत्या. संघटनेने यावर आवाज उठवत, कामाचे विभाजन करण्यासंबंधी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. शासनाशी झालेल्या सर्व चर्चांमध्ये हा मुद्दा मांडण्यात आला.
4. COVID-19 काळातील योगदान:
कोरोना महामारीच्या काळात, CHO ने ग्रामीण भागात चाचण्या, लसीकरण, आणि जनजागृतीमध्ये मोठे योगदान दिले. या योगदानाची सरकारने दखल घेतली, परंतु संघटनेने अद्याप मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत. त्यामुळे covid सारख्या महामारीमध्ये काम केल्याचा फायदा समूदाय आरोग्य अधिकारी या संवर्गाच्या अधिकारी यांना व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
5. अन्यायकारक सेल्फी अटेंडन्स व कामावर आधारित मोबदला अँप वर स्थगिती आणणे.
---
संघटनेची आजची स्थिती
आज, महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ही एक सशक्त संघटना बनली आहे. संघटनेच्या आंदोलने, निवेदने आणि पाठपुराव्यामुळे बबरेच प्रश्न मार्गी लागले असून संवर्गाच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी अजूनही लढा सुरू आहे, परंतु:
1. मानधनात सुधारणा( सुसूत्रीकरण, लोयल्टी बोनस)
2. पदाचा शासकीय सेवेत समावेश होणे.
3.कामकाजाची स्पष्टता.
4. बदली धोरण.
5. महत्वाचे म्हणजे समूदाय आरोग्य अधिकारी याना आर्थिक बळ आणि मानसन्मान प्राप्त होणेसाठी नवीन मोठे प्रोजेक्ट सुरू करणे.
या बाबतीत संघटनेने प्रयत्न सूरु ठेवले आहेत.
संघटनेच्या संघर्षमय वाटचालीमुळे, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारली आहे. त्यामुळेच, या संघटनेचा व सदस्यांचा महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात एक विशेष वाटा आहे जो सर्व स्तरातील लाभार्थी, अधिकारी इ. सर्वांना मान्य आहे. यापूढे सुद्धा शासनाशी सुसंवाद करून समूदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या, अडचणी सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे आणि सोबतच ग्रामीण ,दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सदैव तत्पर असणार आहे.
- डॉ. अंकुश वसंतराव मानकर
- राज्याध्यक्ष
- महाराष्ट्र राज्य समूदाय आरोग्य अधिकारी संघटना 5717,महाराष्ट्र
डॉ. अंकुश वसंतराव मानकर
MAHASACHIV DESK
Member 1
Member 2klcmasssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss ncaksllllllllllllll caknsllllllllllllllllllllllll kaconookclls ckasnlkaskljasnklas askcnakljscasnkljc ckaslnclakssc ackalsjcmas ckalscnas clkascn asc aklscnas cklasncas dckldsanc
Our Blogs
Children Education
Lorem Ipsum dolor sit amet, consectetur adipsicing kengan omeg kohm tokito
Poverty Development
Sed leo nisl, posuere at molestie ac, suscipit auctor mauris. Etiam quis metus tempor
Supply drinking water
Orci varius natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus